मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन यांचे वडील ‘वीरू देवगन’ यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका पत्राद्यारे वीरू देवगन यांच्या शोकबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. मात्र पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या त्या पत्राबद्दल आता अजयने मोदींचे आभार मानले आहे. अजयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मोदींने लिहिलेले पत्र देखील शेअर केले आहे.
स्टंट मास्टर ‘वीरू देवगण’ यांचे काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये दीर्घ आजराने निधन झाले होते. वीरू देवगण यांचे वय ८५ वर्ष होते. त्यांच्यावर मुंबईतील सांताक्रूझ येथील सूर्या रुग्णालयात उपचार सुरु होते. आणि उपचारादम्यानच वीरू देवगण यांचे निधन झाले होते.
My Mother & entire Devgan family are deeply touched & humbled in silence by this thoughtful gesture from our Honourable Prime Minister @narendramodi.
Thank you Sir. 🙏 pic.twitter.com/sJzFRzvMZb— Ajay Devgn (@ajaydevgn) June 2, 2019