-->

अजय देवगणची “ही’ इच्छा राहणार अपुरीच 

इच्छेचे काय आहे, अनेक इच्छांचा विचार केला जाऊ शकतो. पण ती पूर्ण होते की नाही याला महत्त्व आहे. सर्वसामान्य माणसापासून सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकाच्या मनात इच्छा येत असतात. अजय देवगणच्या मनातसुद्धा वर्षानुवर्षे अशीच एक इच्छा आहे. जी पूर्ण करण्यासाठी त्याने अतोनात प्रयत्न केले, पण ती पूर्ण होऊ शकली नाही.

आता तर सर्व आशा संपल्या असून अजयची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील “अभिनय सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांच्यासमवेत चित्रपटात काम करण्याची अजय देवगणची इच्छा होती. ही इच्छा चित्रपटसृष्टीतील जवळजवळ प्रत्येक कलाकाराची असते. अजयने जेव्हा बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा दिलीपकुमार फारच निवडक भूमिका साकारत होते. ते वर्षांतून एखादाच चित्रपट करायचे.

यामुळे अजयला त्यांच्यासोबत काम करण्याची जास्त संधी मिळाली नाही. अखेर अजयने दिलीपकुमार यांच्यासमवेत चित्रपट बनवण्याची योजना आखली. दिलीपकुमार यांनी हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविली. या चित्रपटाचे नाव “असर : द इम्पॅक्‍ट’ असे निश्‍चित करण्यात आले. हा चित्रपट बनवण्याची संपूर्ण योजनाही तयार करण्यात आली. परंतु काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि आता तो पूर्ण होण्याचीही शक्‍यता मावळली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.