मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच संजय लीला भंसाली यांच्या आगामी “गंगूबाई काठियावाडी’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझरही नुकताच रिलीज झाला असून तो चाहत्यांनाही खूपच आवडला आहे. “गंगूबाई काठियावाडी’मधील आलिया भट्टचा लेडी डॉनमधील लुकवरही असंख्य कमेंटस् येत आहेत.
View this post on Instagram
याच दरम्यान “गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासंबंधीत एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटात आता अजय देवगणने धमाकेदार एंट्री केली आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अजय देवगणने तब्बल 22 वर्षांनंतर संजय लीला भंसालीसोबत हात मिळविला आहे. “गंगूबाई काठियावाडी’मध्ये अजय देवगण हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन करीम लालाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
View this post on Instagram
अजय देवगन 10 दिवसांमध्येच भंसालीसोबत चित्रपटातील शूटिंग पूर्ण करणार आहे. यापूर्वी अजय देवगणने संजय लीला भंसालीसोबत “हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट 1999मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अजयसह सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायच झाल्यास अजय देवगन सध्या “मैदान’ आणि “मेडे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच तो आता “गंगूबाई काठियावाडी’मध्येही काम करणार आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये याचा सेट उभारण्यात आला आहे.