मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याने “तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर टी सीरीज कंपनीने ओमसोबत आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे “आदीपुरुष’ असे नाव आहे. या चित्रपटात मेगास्टार प्रभास झळकणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक प्रभासने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘आदिपुरूष’ च्या मेकर्सनी आधीच या सिनेमात सैफ अली खान लंकेशची म्हणजेच रावणाची भूमिका साकारणार अशी घोषणा केली आहे. तर प्रभास हा रामाची भूमिका साकारणार आहे. अशात आता अभिनेता या सिनेमात भगवान शिवाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण याबाबत मेकर्सकडून काहीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
या चित्रपटाचे पोस्टर चित्तवेधक आहे. पोस्टर पाहिल्यावर रामायणासारखा फील येतो. यात धनुर्धारी अशी एक इमेज आहे. शिवाय, हनुमानाचा चेहराही यात दर्शवण्यात आला आहे. तर रावणासारखी आक्राळविक्राळ तोंडही दिसतात. पण हा प्रकार नेमका काय आहे ते मात्र कळलेले नाही.
चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय असं त्याचं साधारण स्वरुप असणार आहे. यावरून रामायणाचा एक भाग दाखविण्यात येणार असल्याचे समजते. यात प्रभाससोबत सैफ अली खानला अप्रोच करण्यात आले आहे. सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाचं बजेट तब्बल साडेतीनशे कोटी असणार आहे. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटाचा ओम राऊत दिग्दर्शक तर आहेच, पण तो निर्माताही असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2021मध्ये सुरू करण्यात येणार असून 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.