थॅंक गॉड या एका धमाल कॉमेडी सिनेमाचे शूटिंग सध्या जोरात सुरू आहे. संशयखोर पती आणि त्याची यशस्वी पत्नी यांच्यातील ही धमाल कॉमेडी असणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा हा पतीच्या रोलमध्ये तर रकुल प्रीत सिंह पत्नीच्या रोलमध्ये दिसणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे अजय देवगण चक्क यमराज म्हणून दिसणार आहे.
सध्या या सिनेमाचे शूटिंग मेहबूब स्टुडिओमध्ये सुरू आहे. तिथे स्वर्गाचा एक सेट उभारला गेला आहे. तिथे बसून अजय देवगण पृथ्वीवरील लोकांच्या पाप-पुण्याचा हिशेब करताना दिसणार आहे.
या हिशेबाच्या आधारेच लोकांना स्वर्गात पाठवायचे की नरकात पाठवायचे याचा निर्णय तो घेत असतो. हा यमराज आपली सुपर नॅचरल पॉवर वपरताना दिसत नाही. “तकदीरवाला’मध्ये कादर खान यांनीही अशाच प्रकारे यमराज साकारला होता, हे अनेकांना लक्षात असेल.
थोड्या मॉडर्न अवतारामध्ये “ओह माय गॉड’मध्ये अक्षयकुमारने कृष्ण साकारला होता. तशीच काहीशी विनोदी भूमिका अजयच्या वाट्याला आली आहे.
सध्या अजयच्या “मैदान’चे शूटिंग पावसामुळे थांबले आहे. पहिल्यांदा लॉकडाऊन आणि नंतर वादळामुळे या सिनेमाचा सेट उद्ध्वस्त झाला होता.