बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या आगामी “भूज ः द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाची प्रेक्षकांना खुपच उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. यात अजय देवगण भारतीय वायुदलातील विंग कमांडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
First look… #AjayDevgn in #BhujThePrideOfIndia… Directed by Abhishek Dudhaiya… 14 Aug 2020 release.
कार्णिक हे 1971मधील युद्धावेळी भूज येथील एअरबेसचे इंचार्ज होते आणि पाकिस्तानकडून गोळीबार होत असतानाही त्यांनी एअरबेसला ऑपरेशनल ठेवले होते. या चित्रपटातून अजय देवगण पहिल्यांदाच एअरफोर्सच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. “भूज’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक दुधाइया यांनी नुकताच सोशल मीडियावर चित्रपटातील अजयचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फर्स्ट लूक रिलीज करताना त्यांनी पोस्ट केले की, माझा आगामी “भूज ः द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटातून स्क्वॉड्रन लीडर विजय कार्णिकच्या रूपात अजय देवगणचा फर्स्ट लूक शेअर करणे हे माझे नशीब आहे.
दरम्यान, अजय देवगणच्या रूपात स्वतःला अनुभवणारे विजय कार्णिकही खूप उत्साहित आहेत आणि त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, अजय या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो. तसेच हा चित्रपट स्वातंत्र्य दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.