सिंघमसारखे दमदार ऍक्शनपटात भूमिका साकारणारा अजय देवगण आता यमदूताची भूमिका साकारत आहे. “थॅंक गॉड’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंदरकुमार करत आहेत.
भूषण कुमार आणि आनंद पंडित हे दोघे निर्माते आहेत. हा चित्रपट म्हणजे विनोदाचा तडका असणार आहे. या चित्रपटात यमलोकातील कहाणी दाखवली जाणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग पूर्ण झाला आहे.
करोना संकट टळल्यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. यमदूत आतापर्यंत भल्यामोठ्या शरीरयष्टीचा दाखविले जात असला तरी अजयचा गेटअप सामान्य माणसांसारखा असेल. यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीतची प्रेमकथा दाखवली जाईल. अजय देवगण याने याअगोदर गोलमाल सिरीजमध्ये कॉमेडी भूमिका साकारलेली आहे.