Ajax Engineering IPO: अनेक कंपन्या शेअर बाजारात सुचिबद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक कंपन्यांनी आयपीओची देखील घोषणा केली आहे. आता Ajax Engineering चा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 379 कोटी रुपये उभारले आहेत. या गुंतवणूकदारांमध्ये एसबीआय म्युच्युअल फंड, अॅक्सिस एमएफ, एचएसबीसी एमएफ, आयटीआय एफएम आदींचा समावेश आहे.
कंपनीने एकूण 23 अँकर गुंतवणूकदारांकडून प्रति शेअर 629 रुपयांच्या दराने 379.30 कोटी रुपये जमा उभारले आहेत. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना एकूण 60.30 लाख शेअर्सचे वाटप केले.
Ajax Engineering चा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 फेब्रुवारीला खुला होईल. तर 12 फेब्रुवारीपर्यंत यामध्ये गुंतवणुकीची संधी असेल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 1269.35 कोटी रुपये उभारणार आहेत. आयपीओ अंतर्गत एकूण 2.02 कोटी शेअर्सचा समावेश आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित आहे. हा एक मेनबोर्ड आयपीओ आहे, त्यामुळे याचे लिस्टिंग बीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी होईल.
आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर 599 रुपये ते 629 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. याची लॉट साइज 23 शेअर्स आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 14,467 रुपये गुंतवावे लागतील. तसेच, कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी प्रति शेअर 59 रुपयांची सूट दिली आहे.
सध्या कंपनीच्या शेअरला ग्रे मार्केटमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रति शेअरच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. त्यामुळे लिस्टिंगवेळी शेअर्सच्या किंमतीत वाढ पाहायला मिळू शकते. मात्र, गुंतवणुकीपूर्वी सर्व गोष्टींची माहिती घ्यायला हवी.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)