मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये सीक्वेलचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये सिंगम, गदर , भूल भुलय्या या सुपरहिट चित्रपटांचे आपल्याला सीक्वेल पाहायला मिळाले. यामध्ये आता आणखी एका सुपरहिट चित्रपटाची भर पडली आहे. अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘ऐतराज’ चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे.
हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. २० वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल येत आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा हे मुख्य भूमिकेत होते. ‘ऐतराज’चे निर्माते सुभाष घई यांनी या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे.
ऐतराज 2 चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दुसऱ्या दिग्दर्शकाच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती आहे. एका वृत्त पत्राच्या रिपोर्टनुसार, अमित राय ऐतराज 2 चं दिग्दर्शन करणार असल्याची माहिती आहे.
लेखक-दिग्दर्शक अमित राय यांनी ओह माय गॉड 2 चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. 12 नोव्हेंबरला ऐतराज चित्रपट प्रदर्शित होऊन 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही या चित्रपटाची कथा आणि पात्र यांची प्रेक्षकांच्या मनावरील छाप कायम आहे.
View this post on Instagram
सुभाष घई यांनी केली पोस्ट
‘बोल्ड अँड ब्युटीफुल प्रियांका चोप्राने हिंमत दाखवली आणि ते करून दाखवलं. त्यामुळेच 20 वर्षांनंतरही प्रेक्षक तिचा अभिनय विसरू शकलेले नाहीत. सुरुवातीला ती ही भूमिका करताना खूप घाबरली होती, पण तिने ती पूर्ण आत्मविश्वासाने साकारली. आता मुक्ता आर्ट्स तीन वर्षांच्या मेहनतीनंतर एका उत्तम स्क्रिप्टसह ऐतराज 2 साठी सज्ज आहे. वेट अँड वॉच’. असे सुभाष घई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.