पुणे – स्वानिका रॉय, सेरेना रॉड्रिक्स, नीव कोठारी यांनी मानांकित खेळाडूंविरुद्ध सनसनाटी विजय मिळवत अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या स्वानिका रॉयने तिसऱ्या मानांकित श्रेया पठारेचा 1-6, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
महाराष्ट्राच्या बिगर मानांकित सेरेना रॉड्रिक्सने सातव्या मानांकित मध्यप्रदेशच्या साझी जैनचा 6-0, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मेहक कपूरने कर्नाटकच्या आकांक्षा मुत्यालाचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या नीव कोठारीने चौथ्या मानांकित तामिळनाडूच्या प्रणव एसआरचा 6-2, 6-3 असा पराभव केला.
#BiharWACT2024 : भारताचा विजयी धडाका कायम, दुसऱ्या सामन्यात द. कोरियाचा उडवला धुव्वा…
अर्णव बनसोडेने क्वालिफायर आदित्य गायकवाडचा 6-2, 6-4 असा तर, पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अर्जुन किर्तनेने नचिकेत गोरेचा 6-1, 6-2 असा सहज पराभव केला.