ALL INDIA RANKING SUPER SERIES U-18 TENNIS TOURNAMENT 2024 – मुलांच्या एकेरीतून स्वराज ढमढेरेने तर दुहेरीतून नील केळकर व अर्जुन किर्तने यांनी अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज १८ वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. डेनिका फर्नांडो हिने मुलींच्या एकेरी व दुहेरी अशा दोन्ही गटातून विजेतेपद पटकावताना दुहेरी मुकुट मिळविला.
एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित स्वराज ढमढेरेने नीव कोठारीचा 7-5, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या डेनिका फर्नांडोने दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या पार्थसारथी मुंढेचा 6-4, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अर्जुन किर्तनेने नील केळकरच्या साथीत कर्नाटकच्या अजय राधाकृष्णन व महाराष्ट्राच्या शरण सोमसी यांचा 6-1, 6-3 असा पराभव विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या डेनिका फर्नांडो व पार्थसारथी मुंढे या अव्वल मानांकित जोडीने अदिती खानापुरी व संस्कृती लाल यांचा 6-4, 6-3 असा पराभव विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी तहसीलदार ज्ञानेश्वर कारकर, ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी उमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मारुती राऊत, एआयटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.