मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार ऐश्‍वर्या

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मणिरत्नम यांच्या ‘पोंनियिन सेलवन’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी ऐश्वर्या रायने आपला होकार कळवला असून तिनेही आपण या चित्रपटात काम करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा चित्रपट कलकी लिखीत प्रसिद्ध कांदबरी पोंनियिन सेलवनवर आधारलेला आहे. पोंनियिन सेलवन हा मणिरत्नम यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. या चित्रपटात ऐश्वर्या कोणती भूमिका साकरणार याची अधिकृत घोषणा अजूनही झाली नाही.

मात्र, ती या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात मी काम करत आहे. तुर्त या चित्रपटाविषयी मी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही, मणिरत्नम हे माझे गुरू आहेत. माझा पहिला चित्रपट मी त्यांच्यासोबत केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे असे ऐश्‍वर्याने या चित्रपटा विषयी बोलताना सांगितले.

ऐश्वर्या या चित्रपटात चोल साम्राज्याचे खजिनदार पेरिया पज्हवेत्तुरायर यांच्या पत्नी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्तेसाठी आसुसलेली स्त्री पतीला कटकारस्थानात सहभागी करून चोल वंशाच्या पतनाची शप्पथ घेते. भूतकाळात याच वंशामुळे सहन कराव्या लागलेल्या मानहानीचा प्रतिशोध ती घेते तिच्या प्रतिशोधाची, हट्टाची, लालसेची कहाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. यापूर्वी ‘खाकी’ चित्रपटात ऐश्वर्याने खलनायिकेची भूमिका साकारली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.