ऐश्वर्या रॉय बऱ्याच दिवसात कोणत्याच सिनेमामध्ये दिसली नव्हती. आता लवकरच ती एका सिनेमात चक्क डबलरोलमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा द ग्रेट मणिरत्नम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होतो आहे.
यापूर्वी “गुरु’, “रावण’ आणि “ईरुवर’ या सिनेमांमध्ये ऐश्वर्याने मणिरत्नमबरोबर काम केले आहे. मणिरत्नम आपले गुरू आहेत आणि देशातील प्रतिभासंपन्न दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करणे आपल्यासाठी भाग्याचे आहे, असे ऐश्वर्या म्हणाली होती.
बऱ्याच काळापासून मणिरत्नम यांच्याबरोबर काम करण्याच्या संधीची वाट बघत असल्याचेही ऐश्वर्याने सांगितले. यापूर्वी “जीन्स’मध्ये ऐश्वर्याने एका गाण्यात डबल रोल साकारला होता. आता पूर्ण भिन्न व्यक्तिरेखा तिला साकारायच्या आहेत. अलिकडेच “मालफिसेंट : मिस्ट्रेस ऑफ एव्हिल’मध्ये अँजेलिना जोलीच्या रोलला ऐश्वर्याने हिंदीमध्ये डबिंग केले होते.
हा सिनेमा 18 ऑक्टोबरला रिलीज होतो आहे. याशिवाय “फन्ने खान’मध्ये ऐश्वर्याने सिंगींग सुपरस्टारचा रोल केला होता. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण ऐश्वर्याच्या रोलचे खूप कौतुक झाले होते. मणिरत्नमच्या सिनेमामध्ये तिच्याबरोबर आणखी कोणकोण आहे, हे काही अद्याप समजू शकलेले नाही.