मुंबई – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे आजही लाखो चाहते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी आजही तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून फॅन्सने ऐश्वर्याचे जुने व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली आहे. ऐश्वर्याची एक जुनी जाहिरात सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये ऐश्वर्या केवळ ३ सेकंद स्क्रिनवर दिसली असली तरी तिची झलक सर्वांना अगदी मोहित करून टाकते.
साल 1993 साली एक कोल्ड्रिंकची जाहिरात आली होती. ज्यामध्ये- आमिर खान, महिमा चौधरी आणि ऐश्वर्या राय महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. ब्युटी क्वीन होण्याआधीही ऐश्वर्याने खूप नाव कमावले होते. ऐश्वर्या रायला तिच्या सौंदर्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स देखील मिळाले, पण कोल्ड्रिंकच्या जाहिरातीतून तिला मिळालेले यशाची तिच्या प्रसिद्धीशी तुलना करता येत नाही. आता ही जाहिरात जुनी वाटत असली तरी याच जाहिरातीने ऐश्वर्याचे नशीब पालटले होते.
ऐश्वर्या रायने शेवटची 2018 मध्ये ‘फन्ने खा’ चित्रपटात दिसली होती. आता ऐश्वर्या लवकरच ‘पोनियिन सेल्वन’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात म्हणजेच ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा चोल शासकांची कथा आहे. प्रदीर्घ काळानंतर ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्यामुळे सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.