मुंबई – बहुचर्चित पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय आज दिल्लीच्या लोकनायक भवनात ईडीसमोर हजर होणार आहे.पनामा पेपर्स प्रकरणाचा तपास प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. याप्रकरणी अभिषेक बच्चनचीही चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी ऐश्वर्याला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी तयार केली आहे.
ऐश्वर्या रायने याआधी ही कागदपत्रे खोटी असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणा सिनेतारक आणि उद्योगपतींसह ५०० भारतीयांची नावे आहेत. या पेपर लीकमध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींची नावे होती. सर्व लोकांवर कर फसवणुकीचे आरोप होते.
पनामा पेपर्स प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अमिताभ यांनी भारतीय नियमांनुसारच परदेशात पैसे पाठवले असल्याचे सांगितले होते. पनामा पेपर्समध्ये समोर आलेल्या कंपन्यांशी संबंध नसल्याचाही त्यांनी सांगितले होते.