ऐश्‍वर्याकडे पुन्हा एकदा गुडन्यूज…?

ऐश्‍वर्या आणि अभिषेकचा एक फोटो अलिकडेच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ऐश्‍वर्या पुन्हा आई होण्याच्या बेतात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ऐश्‍वर्याच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीबाबतची जोरदार चर्चा व्हायला लागली आहे. एका फॅनने तर सोशल मिडीयावर या फोटोचा संदर्भ दिला आणि ऐश्‍वर्याला आणखी एक मूल व्हायला काहीही हरकत नाही, असेही म्हटले आहे. आता तर अराध्याही 8 वर्षांची होऊन गेली अहे. त्यामुळे दुसरा चान्स घेण्यास काहीच हरकत नसावी, असाच एकूण सगळ्या फॅन्सच्या प्रतिक्रियेचा सूर होता.

काहींनी तर अराध्याला भाऊ – बहिण हवे असेही म्हटले आहे. मात्र ऐश्‍वर्याच्या प्रतिनिधीने स्वतःच ही चर्चा थांबवली आहे. ऐश्‍वर्याकडे पुन्हा गुडन्यूज वगैरे काहीही नाही. हा फोटो म्हणजे केवळ कॅमेऱ्याचा अँगल बदलल्यामुळे तसा भास होतो आहे, इतकेच आहे. गुडन्यूजची बातमी अगदी निराधार आहे, असे या प्रवक्‍त्याने सांगितले. ऐश्‍वर्या आणि अभिषेक बच्चनचे लग्न 2007 साली झाले होते. त्यानंतर 2011 साली त्यांची कन्या अराध्याचा जन्म झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.