मुंबई : बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ मुलगा अभिनेता ‘अभिषेक बच्चन’ याचा देखील कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
बच्चन पिता-पुत्रांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली जात होती. अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघींचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. तर जया बच्चन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिली आहे.