इराणच्या तेल टॅंकरवर क्षेपणास्त्र हल्ला

तेहरान  – सौदी अरेबियाच्या जेद्दाह बंदरापासून सुमारे शंभर किमी अंतरावर सागरात उभ्या असलेल्या इराणी तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या जहाजातून लाल समुद्रात तेलगळती सुरू झाली आहे.

या जहाजावर दोन स्फोट झाले. हे दोन्हीं स्फोट क्षेपणास्त्र हल्ल्यांचेच असावेत असा या जहाज कंपनीचा अंदाज आहे. या घटनेनंतर जहाजावर आग लागली अजून जहाजातील तेलाची समुद्रात गळती सुरू झाली आहे.

मात्र या प्रकारात जहाजावरील कोणीहीं जखमी वा ठार झाल्याचे वृत्त नाही. ही गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे लागेली आग किरकोळ स्वरूपाची होती. ती लगेच विझवण्यात आली. त्यामुळे हे जहाज आता स्थीर आहे. ते बुडण्याचा धोका टळला आहे अशी माहिती संबंधीत कंपनीकडून देण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.