काबूल- अफगाणिस्तानच्या वायू दलाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये आज 15 तालिबानी दहशतवादी ठार झाले. तर अन्य 10 जण जखमी झाले. अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात हा हवाई हल्ला करण्यात आला, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
तालिबानी दहशतवाद्यांनी मंगळवारी मैवांड जिल्ह्यातील सरा बाघल भागातल्या चेकपोस्टवर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये तीन पोलीस अधिकारी ठार झाले आणि अन्य चौघेजण जखमी झाले होते.
त्यानंतर अफगाणिस्तानच्या वायूदलाने कंदहार प्रांतात हा हवाई हल्ला केला, असे पोलिसांचे प्रवक्ते जमाल नसीर बरकझाई यांनी सांगितले. वायूदलाच्या या हवाई हल्ल्याबाबत तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.