येमेनमधील हवाई हल्ल्यात 31 ठार

दुबई : येमेनवर शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्‌यात 31 जण ठार झाले, असे संयुक्‍त राष्ट्राने म्हटले आहे. आपले एक विमान पाडले गेल्याचा दावा इराणच्या समर्थीत हूथी बंडखोरांनी केला होता. त्या घटनेच्या प्रतिक्रियेसाठी हा हवाई हल्ला केला गेला असल्याचे मानले जात आहे.

शुक्रवारी उत्तर अल-जावफ प्रांतात सरकारी दलाच्या समर्थनार्थ केल्या गेलेल्या कारवाई दरम्यान एक टोर्नाडो विमान पाडण्यात आले. अशाप्रकारे क्‍वचितच घडणाऱ्या घटनेला सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी फौजांनी प्रत्युत्तर दिले आहे. या हवाई हल्ल्यामुळे उत्तर येमेनमध्ये धुमश्‍चक्रीला पुन्हा सुरुवात होण्याची लक्षणे निर्माण झाली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार अल हयजाह भागात झालेल्या या हवाई हल्ल्यामध्ये 31 नागरिक ठार झाले आणि अन्य 12 जण जखमी झाले आहेत, असे येमेनसाठीच्या संयुक्‍त राष्ट्राच्या मानवतावादी समन्वयकाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यानुसार हा भीषण हल्ला होता, असे समन्वयक लिस ग्रेन्ड यांनी म्हटले आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.