#AirStrike : दहशवादी मसुद अझहरचा मेहुणा यूसुफ अज़हर ठार

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. दहशतवादी शिबिरावरील हवाई हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने दहशतवाद्यांच्या सर्व शिबिरावर हल्ला केला. यामध्ये दहशवादी मसुद अझहरचा मेहुणा यूसुफ अझहर आणि मोठा भाऊ ठार झाल्याचे वृत्त आहे.

भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक आयोजित केली. या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सशस्त्र सेना, नागरिकांना “सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी सज्ज” राहण्याचे सांगितले आहे.

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या कारवाईत सुमारे ३०० दहशतवादी मारले गेले आहेत. ज्यात मसुद अझहरचा मेहुणा जसफ अझहर याला ठार मारण्यात आले. या महान ऑपरेशनसाठी भारतीय वायुसेनेला १२ मिराज लढाऊ विमानांचा वापर केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तसेच बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद लॉन्च पॅड पूर्णपणे नष्ट झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.