#AirStrike : ट्रम्प यांचे ‘ते’ भाकीत खरे ठरले !

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकवर कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले.

तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते कि, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात तणावाची परिस्थिती आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो. दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. मात्र’भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.’यापूर्वीच अंदाज वर्तवला होता, आणि त्यांचा अंदाज अगदी खरा ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.