येरवडा वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष ः बेशिस्त पार्किंगचा परिणाम
वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी
विमानतळ रस्तावरून हा व्हीआयपी रस्ता असल्याने अनेक मान्यवरांचे पुण्यात आगमन झाल्यास याच रस्त्यावरून त्यांची वाहने जातात. त्यामुळे या रस्त्यावर थांबणाऱ्या वाहनांवर येरवडा वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
येरवडा – येरवडा विमानतळ रोडवर गोल्फ चौक ते गुंजन चौक अशी दुतर्फा वाहने लागत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पण याकडे वाहतूक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याने सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीवर ताण येत आहे. विमानतळावर जाणारी येणारी वाहने आजूबाजूला असणारी बिझनेस-बे, कॉमर झोन, आयबीएम यांसारखे आयटी पार्क, सरकारी कार्यालयांमुळे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला “वाहने पार्क करू नयेत,’ असे फलक आहेत. असे असूनही वाहनचालक येथेचे वाहने पार्क करतात. गोल्फ चौकाच्या पुढे बिझनेस-बेमध्ये तसेच बजाज अलायन्झ या इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच येथे कामासाठी येणारे वाहने नागरिक रस्त्यावरच उभी करत असतात. स्थानिक नागरिकही त्यांची वाहने, व्यापारी वाहनेही रस्त्यावर लावली जातात. यावर वाहतूक पोलीस कारवाई करीत नसल्याने बिनधास्तपणे वाहने लावली जातात. याचा त्रास सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना सोसावा लागत आहे.