विमान कंपन्यांचा महसूल 85 टक्‍क्‍यांनी घसरला

नवी दिल्ली – करोना लॉकडाऊनच्या काळात आणि एकूणच करोना निर्बंधांमुळे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत देशातील विमान कंपन्यांना 3 हजार 651 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

त्यांच्या महसुलातील ही तूट 85.7 टक्के इतकी आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विमान कंपन्यांना 5 हजार 745 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विमान कंपन्यांना केवळ 894 कोटी रुपयांचाच महसूल मिळाला आहे असे त्यांनी सांगितले.

महसुलातील तोट्यामुळे विमान कंपन्यांनी सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.