विमान प्रवाशांचंही ‘दिवाळं’

नेहमीपेक्षा सुमारे 12 ते 15 टक्‍क्‍यांनी तिकीट महागले

पुणे – दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर उत्पादन वाढीसाठी विमान कंपन्यांनी तिकीट दर वाढवल्याचे दिसून येते. नेहमीपेक्षा सुमारे 12 ते 15 टक्‍क्‍यांनी तिकीट महागले असून दिवाळी काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

सद्यस्थितीत विमान कंपन्यांनी तिकीट दरात 1 ते 3 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पुण्यातून कोची, बंगळुरू, कोलकाता, जयपूर, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद या प्रमुख ठिकाणी जाणाऱ्या विमानांचा दर दिवाळीत वाढविण्यात आल्याचे दिसून येते.

पुणे-दिल्ली विमानाकरिता इतरवेळी 3 हजार रुपयांच्या घरात असणारे तिकीट 26 ते 30 ऑक्‍टोबर या दिवाळीकाळात तब्बल साडेचार ते पाच हजारांच्या घरात गेल्याचे दिसून येत आहे. तर, पुणे-जयपूरदरम्यान 4 हजार रुपयांच्या घरात असणारे तिकीट दिवाळीत 7 हजारांच्या जवळपास पोहोचले आहे.

पुणे-कोचीदरम्यान अडीच हजारांच्या घरात असणारा तिकीट दर दिवाळी काळात 6 हजारांच्या घरात असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी दिवाळी काळातील 5 दिवसांतील तिकीट दर 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.