नवी दिल्ली – केंद्र सरकारने विमानाला लागणाऱ्या इंधनाच्या दरात आज तब्बल तीन टक्के इतकी वाढ केली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या देशातील विमान कंपन्यांपुढे आता आणखी आव्हानात्मक स्थिती निर्माण होणार आहे.
विमान वाहतूक कंपन्यांनी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची किंवा सवलतींची मागणी केली होती पण त्यांना ती मिळाली नाही पण आज त्यांच्यावर ही मोठी इंधन दरवाढ लादली गेल्याने आता त्यांना यापुढील काळात मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
आज या इंधन दरात प्रति किलो लीटर 1304 रुपये इतकी वाढ झाली. त्यामुळे राजधानी दिल्लीत हा दर आता प्रतिकिलो लीटर 43 हजार 983 इतका झाला आहे. विमान इंधन दरात गेल्या दोन महिन्यात झालेली ही पाचवी वाढ आहे.
दरम्यान, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेल वरील किमती मात्र आज वाढवण्यात आल्या नाहीत.