लंडन : हायड्रोजन इंधनाचा वापर करून आतापर्यंत प्रथमच एका प्रवासी विमानाचे यशस्वी उड्डाण केले असून जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रातील हा महत्वाचा शोध ‘अमी मैला’चा दगड मानला जात आहे. ब्रिटिश एयरोस्पेस स्टार्टअप कंपनी ‘झिरो अव्हिया’ने या विमानाचे डिझाईन केले असून लंडनमध्येच यशस्वी उड्डाण करण्यात आले. अशा प्रकारच्या इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण कमी होणार आहेच शिवाय पारंपरिक इंधनावरील अवलंबित्वही कमी होणार आहे.
‘झिरो अव्हिया’ कंपनीच्या या सहा आसनीं ‘पायपर मास’ नावाच्या या विमानाने लंडनच्या उत्तरेला ५० मैल अंतरावरील क्रैनफील्ड विमानतळावरील ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ साइटवर हा प्रयोग यशस्वी केला. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच उड्डाण असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीला या प्रकल्पात ब्रिटिश सरकारचेही समर्थन लाभले आहे. २५० मैल अंतर पार करण्याची क्षमता असलेले विमान २०२१ च्या अखेरपर्यंत विकसित करण्याचा निश्चय कंपनीने केला आहे.