Airbnb नावाच्या अमेरिकन कंपनीने बाजारात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तिचा आयपीओ येणार आहे. तिचे अमेरिकेन बाजारात काय होणार, हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. या घटनेला महत्त्व यासाठी आहे की आपल्याकडे घरात असलेली अतिरिक्त जागा पर्यटकांना भाड्याने देण्यापासून या कंपनीची सुरुवात झाली.
मोठे शहर आणि पर्यटनस्थळी असलेली जागा जगातील कोणीही नागरिक या कंपनीच्या वेबसाईटवर नोंद करू शकतो. ती जागा प्रवाशांना पसंत पडली तर तो त्याठिकाणी येऊन घरच्या सारखा राहू शकतो. असे राहणे, हे हॉटेलपेक्षा बऱ्यापैकी स्वस्त पडते. त्यामुळे जगभरातील पर्यटक विशेषतः तरुण या पद्धतीने पर्यटन करतात. याa भाड्यातील काही वाटा कंपनी घेते, असे हे मॉडेल आहे. पण इंटरनेटमुळे ती कंपनी आज मोठी झाली आहे. भारतातही अशा अनेक घरांची नोंद या कंपनीत होते आहे. कंपनीचा आयपीओ 2020 मध्ये येणार आहे.