एयर स्ट्राइकमुळे कर्नाटकमध्ये नक्कीच विजय मिळवू -येदियुरप्पा

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. या पार्श्वभूमी कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत आणि निर्णायक नेतृत्वामुळे एयर स्ट्राइक यशस्वी झाली, यामुळे देशात मोदी लाट कायम असून पक्षही मजबूत होत आहे. याचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपला 28 पैकी 22 जागा मिळतील, आम्हाला विश्वास आहे, आम्ही कर्नाटकमध्ये 22 जागांवर नक्कीच विजय मिळवू असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.