#AirStrike : राहुल गांधींचा भारतीय हवाई दलाला सलाम 

नवी दिल्ली –  पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकवर कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना सलाम केला आहे.

दरम्यान, १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तसेच  बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद लॉन्च पॅड पूर्णपणे नष्ट झाले. तर या हल्ल्यात जवळपास २००-३०० दहशतवादीही ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.