लहान मुलांवर हवेतील प्रदूषणाचा फारच लवकर परिणाम झाल्याचे दिसून येत असून, ही त्यांच्या आरोग्यासाठीची दीर्घकालीन समस्या बनू शकते. अनेक अभ्यासांती असे लक्षात आले आहे की, न्यूमोनिया, दमा, अस्थमा आदी श्वसनविकारांशी हवेच्या प्रदूषणाचा फार निकटचा संबंध असतो. युनिसेफच्या अहवालानुसार, आंतररष्ट्रीय मर्यादेपेक्षा सहा पट अधिक प्रदूषित हवेमध्ये जगणा-या बालकांची संख्या १७ दशलक्ष असून, यामुळे त्यांच्या मेंदूच्या विकासामध्ये भीषण बाधा निर्माण होऊ शकते. यापैकी, १२ दशलक्ष इतक्या मोठय़ा संख्येची बालके एकटय़ा दक्षिण आशिया खंडात जन्माला येतात. त्याचा मुलांच्या प्रतिकार शक्तीवरही विपरित परिणाम होत असून मेंदू, फुफ्फुसे आणि बौद्धिक विकासावरही हवा प्रदूषण नकारात्मक परिणाम घडवून आणते. जर योग्य वेळी योग्य ते उपचार घेतले गेले नाहीत, तर हवेच्या प्रदूषणाचे परिणाम मुलांना आयुष्यभर भोगावे लागतात.
हवा प्रदूषणाचा लहान मुलांच्या फुफ्फुसांच्या व मेंदूच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. श्वासावाटे किती हवा शरिरात ओढली जाते, हे शारीरिक हालचालींवरही बरेचसे अवलंबून असते. मैदानी खेळ खेळणारी मुले बसलेल्या मुलांपेक्षा अधिक हवा श्वसन करतात. मुलांमधील श्वसन प्रमाणाच्या या फरकामुळेही त्यांना असलेला प्रदूषणकारी घटकांचा धोका कमी-अधिक प्रमाणात वाढू शकतो. स्वच्छ हवेमध्ये मुलांच्या मेंदू व फुफ्फुसांची वाढ झपाटय़ाने व व्यवस्थित होते.
प्रौढांपेक्षा लहान मुलांवर हवेतील प्रदूषणाचा फार लवकर परिणाम होतो. त्यांची फुफ्फुसे व प्रतिकार शक्ती विकसित होण्याच्या मार्गावर असल्यामुळे हवेतील प्रदूषित घटक त्यांच्या शरीरात श्वसनावाटे अधिक प्रमाणात जाऊ शकतात. काही मुलांमध्ये याचे प्रमाण फारच जास्त असते. दीर्घकालीन फुफ्फुसरोग किंवा अस्थमा असलेल्या लोकांना तर अशा परिस्थितीत मोठा धोका उद्भवतो. हवेच्या प्रदूषणापासून स्वत:च्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेतानाच दर्जेदार एअर प्युरिफायर्सचा वापर करणे अत्यावश्यक असते. ब्लूएअरच्या आयओटीयुक्त एअर प्युरिफायर्सच्या मदतीने, कार्यालयात काम करतानाही आपल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने घरातील हवेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता पालकांमध्ये येत असून आपल्या मुलांना हवेच्या प्रदूषणापासून सुरक्षित ठेवता येते.
लहान मुलांमधील अस्थमा किंवा अन्य श्वसनविकार होण्यामागे अंतर्गत व बाह्य वातावरणातील हवा प्रदूषणाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. बाह्य वातावरणातील हवेच्या प्रदूषणावर आपण नियंत्रण ठेवूशकत नसलो, तरीही मुलांना योग्य वेळेत घरी बोलावून बाहेरील हवा प्रदूषणापासून त्यांचे रक्षण करता येते. अंतर्गत हवा प्रदूषण टाळण्यासाठी धूम्रपान टाळले पाहिजे. जुने कार्पेट, लोकरीची खेळणी आदी स्वच्छ ठेवल्यास खोलीतील हवाही स्वच्छ राहू शकते. लहान मुले झोपण्यापूर्वी त्यांच्या खोलीतील हवा हेपा (हाय एफिशिएन्सी एअर फिल्टर्स) तंत्रज्ञानाच्या एअर प्युरिफायर्सच्या मदतीने स्वच्छ करून घेणे आवश्यक असते. खोलीतील एअर क्लिनर्स दरवर्षी बदलणे आवश्यक असून, असे केल्यास ते परिणामकारक कामगिरी दाखवू शकतात.
पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) २.५ हे प्रमाण आरोग्यावर गंभीर परिणाम करते. त्यामुळे, अस्थमा, दमा, दीर्घकालीन श्वसनविकार, श्वासोच्छवासाचे विकार, श्वास घेताना वेदना होणे, अकाली मृत्यू तसेच, फुफ्फुसाचे रोग आदी समस्या मोठय़ा प्रमाणात उद्भवू शकतात.