आरकेएस भदौरिया होणार इंडियन एअर फोर्सचे पुढचे प्रमुख

नवी दिल्ली- संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी नविन हवाई दल प्रमुखाची घोषणा केली असून पुढचे एअर मार्शल आरकेएस भदौरिया हे भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख असतील. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्‌याने ट्‌विटरवरुन ही माहिती दिली.

सध्या ते एअर फोर्सचे व्हाइस चीफ आहेत. त्यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली होती. सध्याचे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ 30 सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. सरकारने एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांची हवाई दल प्रमुखपदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरकेएस भदौरिया 1980 साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले. भदौरिया यांच्याकडे 4250 तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह 26 वेगवेगळया प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. एअर फोर्स प्रमुख पदावर पोहोचण्याआधी त्यांनी अन्य महत्वाच्या पदांवर वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. जॅग्वार स्क्वाड्रनचे नेतृत्व त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.