सिडनी विमानतळावरील उचलेगिरी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला महागात

नवी दिल्ली- सिडनी विमानतळावरील करमुक्‍त दुकानातून पाकिटाची चोरी केल्याबद्दल एअर इंडियाच्या पूर्व विभागाच्या एका प्रादेशिक संचालकास निलंबित करण्यत आले आहे. रोहित भसीन असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. भसीन यांना एअर इंडियाच्या आवारामध्ये परवानगीशिवाय प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

भसीन एअर इंडियाच्या एका विमानामध्ये पायलट म्हणून कार्यरत आहेत. सिडनी विमनतळावर पहाटे 6.20 वाजता त्यांनी हे पाकिट दुकानातून उचलले. ऑस्ट्रेलियच्या प्रदेशिक व्यवस्थापकांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान भसीन यांचे विमान 22 जून रोजी स्थानिक वेळेनुसार सिडनीवरोन दिल्लीला यायला निघाले. मात्र विमान दिल्लीला पोहोचताच त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले असून तोपर्यंत भसीन निलंबित राहतील, असे एअर इंडियाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.