एअर इंडियाला तेल कंपन्यांकडून दिलासा

इंधन पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती

नवी दिल्ली : आर्थिक संकटाचा सामना करणारी सरकारची एअर इंडिया कंपनीला तेल कंपन्यांकडून दिलासा देण्यात आला आहे. कारण एअर इंडीयाला इंधन पुरवठा करणारी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीने इंधन बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. एअर इंडियाकडून कंपनीला थकबाकी परत करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडियन ऑईलचे संचालक (वित्त) संदीपकुमार गुप्ता यांनी याविषयीची माहिती लिी आहे. एअर इंडियाने पहिल्यांदा जूनमध्ये आणि नंतर सप्टेंबरमध्ये तीन तेल कंपन्यांना 100 कोटी रुपये देणार असल्याचे आश्‍वासन दिले होते त्यानुसार एव्हिएशप टर्बाइन फ्युएलची जुनी थकबाकी पुर्ण करता येईल. परंतु, जून संपून सप्टेंबर उजाडला तरी एअर इंडियाकडून थकबाकी देण्याचे नाव घेण्यात आले नाही. त्यामुळे मागच्या आठवड्यात तेल कंपन्यांकडून एअर इंडियाला शेवटची तंबी देत 18 ऑक्‍टोबरपर्यंत थकबाकी एकरकमी देण्यासाठी सांगितले होत. एवढेच नाही तर पैसे न दिल्यास सहा मोठ्या देशांतर्गत विमानतळांवर ते इंधन पुरवठा थांबवतील असे त्यांनी म्हटले होते.

ऑगस्टमध्ये इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांनी एअर इंडियाचे थकित इंधन बिल 5,000, कोटींवर पोचले आहे. जे जवळजवळ आठ महिन्यांपासून भरलेले नाही. दरम्यान, 22 ऑगस्ट रोजी आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएलने संपूर्ण पैसे न भरल्यामुळे कोची, मोहाली, पुणे, पाटणा, रांची आणि विझाग या सहा विमानतळांवर एअर इंडियाला इंधन पुरवठा बंद केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)