कुठेच न जाणारी एअर इंडियाची विमानसेवा सुरू होणार

Madhuvan

नवी दिल्ली – मार्च महिन्यापासून प्रवास ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेकांना चुकल्यासारखे वाटत आहे. ही बाब ध्यानात घेऊन एअर इंडियाने कुठेच न जाणारी विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली आहे.

वृत्त माध्यमातील बातम्यांनुसार एअर इंडियाचे हे विमान ज्या शहरातून उडेल त्या शहरात परत येऊन लॅंड होईल. त्यामुळे प्रवाशांना प्रवास केल्याचे समाधान मिळेल. दुसऱ्या शहरात जाण्याची गरज पडणार नाही, अशी यामागे कल्पना आहे.

इतरांची तिकिटे दहा मिनिटात विकली 

असा प्रकार भारतात प्रथमच घडणार असला तरी ऑस्ट्रेलियातील क्वांटास्‌ एअरवेजने असा प्रयोग यशस्वी केला आहे. अशी योजना जाहीर झाल्यानंतर या रूटवरील वरील सर्व तिकिटे दहा मिनिटात विकली गेली. सिंगापूर एअरलाइन्सही अशी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यात विमान जास्त उंचावरून न उडता पर्यटनस्थळांना स्पर्श करून परत येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.