नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची आता आणखी ताकद वाढणार आहे. कारण भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकेचे शक्तीशाली अपाचे हेलिकॉप्टर्स ताफ्यात आज दाखल होणार आहे. अमेरिकेची आठ अपाचे एएच 64 ई हे हवाई दलात दाखल होणार आहेत.
Punjab: Apache helicopter of the Indian Air Force ready to be inducted at the Pathankot Air Base. The Indian Air Force will induct 22 of these choppers acquired from the US. pic.twitter.com/ezJoGMaRW7
— ANI (@ANI) September 3, 2019
पठाणकोट हवाई दलाच्या तळावर आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी एअर चिफ मार्शल बी.एस.धनोआ यांच्या उपस्थितीत अमेरिकेच्या या अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचा हवाई दलात समावेश होणार आहे. आक्रमक हेलिकॉप्टर्स म्हणून जगात अपाचे हेलिकॉप्टर्सची अटॅक हेलिकॉप्टर म्हणून ओळख आहे. याचा वापर उंच डोंगरांमध्ये केला जातो. भारताकडून युद्ध भूमीवर अत्यंत उपयुक्त असणाऱ्या 22 अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा सप्टेंबर 2015 मध्ये अमेरिकेसोबत करार करण्यात आला होता. कोट्यवधींचा हा व्यवहार असून यातील पहिल्या चार अपाचे हेलिकॉप्टरची तुकडी बोईंगने जुलै महिन्यात भारतीय हवाई दलास सुपूर्द केली आहे. दरम्यान, आपल्या सशस्त्र दलासाठी या हेलिकॉप्टर्सची खरेदी करणारा भारत हा 14 वा देश ठरला आहे.