रॉनी स्क्रूवालाच्या आगामी तेजसमध्ये कंगणा रणावतने एअरफोर्स पायलटचा रोल स्वीकारला आहे. कंगणाला नेहमीच धाडसी रोल करायला आवडतात. तिच्या रोलमध्ये ऍक्शन असते.
तिला लहानपणापासून युद्धपटांनी भुरळ घातली आहे. जवानांबद्दल तिला नेहमीच आदर आणि सद्भावना वाटत आली आहे.
त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना लपवणे तिला जमलेले नाही. जवानांमुळेच आपला देश सुरक्षित आहे, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असे तिने म्हटले आहे. तेजसच्या रोलसाठी तिला दोन आठवड्यांचे विशेष ट्रेनिंगही घ्यायला लागले आहे. या व्यतिरिक्त बहुप्रतिक्षित थलायवीसाठीही तिची तयारी सुरू आहे.
थलायवीचे शुटिंग संपल्यावर ती तेजसच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमासाठी कंगणाने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा सखोल अभ्यास केला आहे. पाकिस्तानात पकडले गेल्यापासून तेथून सुटका होईपर्यंत बहुतेक गोष्टींबाबत सर्वकाही तिने वाचून काढले.
हवाई दलाचा युनिफॉर्म घालायला आपण अगदी उत्सुक असल्याचेही तिने सांगितले. सर्वेश मेवारा दिग्दर्शन करणार असलेल्या तेजसचे शुटिंग जुलैपासून सुरू होणार आहे.