वायू सेनेचे अभिनंदन; अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला अपुर्ण : संजय राऊत

संग्रहित छायाचित्र

मुंबई – जम्मू-काश्मीरच्या फुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात भारताचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला. आज भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले आहेत. या हल्ल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली कि,”हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काशमीर वर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मद चा सैतान अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)