‘राफेल’बाबत हवाई दल प्रमुखांनी दिली ‘ही’ माहिती….

नवी दिल्ली – राफेलमधील नुसता र शब्द जरी कॉंग्रेस नेत्यांकडून उच्चारला गेला तरी भाजपचे चार-चार नेते त्याच्यावर तुटून पडतात. राफेल विमान करारावरून गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच राफेल विमान भारतात कधीपर्यंत येऊ शकेल, याबाबत भारतीय हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी माहिती दिली आहे.

राफेल ही लढाऊ विमानं साधारणपणे याच वर्षी सप्टेंबरपर्यत दाखल होतील, असं भारतीय हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

किती अतिरेकी मारले हे मोजणे आमचे काम नाही – वायूदल

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताला राफेल विमानांची उणिव भासली, आज भारताकडे राफेल विमाने असली असती तर चित्र आणखीन वेगळे दिसले असते असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एकेठिकाणी केले होते. त्याला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोदींमुळेच भारताला राफेल विमाने मिळण्यास विलंब झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पुन्हा सुरू झाले राफेलवरून शाब्दिक युद्ध 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)