हवाई दलप्रमुख फ्रान्स दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली – हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया आज फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले. भदौरिया यांच्या 19 ते 23 एप्रिलदरम्यानच्या या दौऱ्यामुळे उभय देशातल्या हवाई दलात परस्पर संवाद बळकट होणार आहे. या भेटीदरम्यान ते फ्रान्सच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी चर्चा करतील आणि हवाई तळांना भेट देतील.

फ्रान्सचे हवाई आणि अंतराळ दलाचे चिफ ऑफ स्टाफ जनरल फिलीप लेविने यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये भारताला भेट दिली होती. त्यानंतर भदौरिया फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत.

मागच्या काही काळात दोन्ही देशांच्या हवाई दलात लक्षणीय कार्यात्मक संवाद होत आहे. दोन्ही देशांच्या हवाई दलांनी द्विपक्षीय हवाई सराव प्रात्यक्षिकांची गरूडा ही मालिका, तसेच यावर्षी जानेवारी महिन्यात जोधपूर येथे एक्‍स डेझर्ट नाईट 21 प्रात्यक्षिकांतर्गत होप सराव यामध्ये सहभाग घेतला होता. 

मार्च महिन्यामध्ये संयुक्‍त अरब अमिरात हवाई दलाने इतर मित्र राष्ट्रांसमवेत आयोजित केलेल्या एक्‍स डेझर्ट फ्लाग युद्धाभ्यासातही भारत आणि फ्रान्सची हवाई दले सहभागी झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.