Nagpur Violence: मुघल शासक औरंगजेबाच्या थडग्यावरून झालेल्या गदारोळात महाराष्ट्रातील नागपूरमध्ये हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता आहे. नागपुरात सोमवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे प्रशासनाने अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे. या काळात अनेक घरांची तोडफोड करण्यात आली, एका वैद्यकीय दवाखान्याला आग लावण्यात आली आणि अनेक वाहने जाळण्यात आली. या चकमकीत सहा नागरिकांसह 33 पोलीस जखमी झाले आहेत.
नागपूर हिंसाचारावर ओवेसी काय म्हणाले?
पहिली घटना मध्य नागपुरातील चिटणीस पार्क परिसरात सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली, जिथे दोन गटात हाणामारी झाली. काही तासांनंतर, 10.30 ते 11.30 च्या दरम्यान, जुना भंडारा रोडजवळ असलेल्या हंसपुरी परिसरात आणखी एक हिंसक घटना घडली. या घटनेनंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे वक्तव्य समोर आले आहे.
#WATCH | Delhi: On Nagpur violence, AIMIM Chief Asaduddin Owaisi says, “In last few weeks, the statements which the CM and other ministers of Maharashtra government are giving, that need to be seen. The biggest provocative statements are coming from the government… They don’t… pic.twitter.com/Wup1gDBpn8
— ANI (@ANI) March 18, 2025
नागपूर हिंसाचारावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांत महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री जी विधाने करत आहेत ते पाहण्याची गरज आहे. सरकारकडून अत्यंत भडकाऊ विधाने येत आहेत. त्यांना आपली जबाबदारीही कळत नाही की ते मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एका खास बादशाहाचे पुतळे जाळले, त्यावर काही प्रतिक्रिया आली नाही आणि त्यांना हे आवडले नाही. त्यामुळे त्यांनी कपड्यावर कुराण च्या ओळी लिहून जाळल्या. हे होत असताना हिंदू आणि मुसलमानांनी डीसीपीकडे तक्रार केली. त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर हिंसाचार झाला. हे सरकार आणि गुप्तचर विभागाचे अपयश आहे. जे झाले ते योग्य नाही.”
पोलीस कडक कारवाई करत आहेत –
हिंसाचारानंतर नागपूर पोलिसांनी महल परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली, ज्यामध्ये आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली असून 50 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांची ओळख पटवली जात असल्याचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडीओ तपासले जात आहेत जेणेकरुन बदमाशांना ओळखता येईल. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.