नवी दिल्ली – ऍस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गाठी होण्याचा कोणतीही धोकादायक शक्यता दिसत नसल्याने ही लस थांबवण्याचे कोणतेही करण दिसत नसल्याचे प्रतिपादन करत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेला पाठींबा दिला.
ही लस काही केवळ युरोपीय राष्ट्रातच वापरली जात आहे असे नाही तर, इंग्लंड आणि भारतासह अन्य देशांतही ती वापरली जात आहे. डेन्मार्क आणि अन्य देशांतही त्याच्या चाचणीत अथवा नंतर लस दिल्यावर कोणतीही धोकादायक लक्षणे आढळली नसल्याचे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि पोर्तुगालने ऍस्ट्राझेनेकाच्या लसीचे वितरण थांबवले आहे. इटली, पोर्तुगाल, सोल्व्हानिया,लॅटव्हिआ, इडोनेशिया यांनीही हे डोस देणे थांबवले आहे. या पार्श्वभूमीवर गुलेरिया म्हणाले, दिलेल्या लसीच्या दुष्परिणामाची बाजू तपासण्यासाठी तिचा वापर थांबवला असावा.
पण लाखो लोकांना यापुर्वी ऍस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस दिला असल्याने वापर थांबवणे शक्य होणार नाही. असे सांगत रक्तात गुठळ्या वाढल्याचा कोणताही तपशील समोर आलेला नाही, असे सांगत त्यांनी या मुद्द्याचा समारोप केला.