रशियाच्या लसीबाबत एम्स प्रमुख गुलेरिया म्हणतात…

नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आज रशियाने कोरोना विषाणूवरील प्रभावी व सुरक्षित लस निर्माण केल्याचा दावा केला. रशियाने निर्माण केलेल्या या लसीला देशाच्या आरोग्य विभागाची परवानगी मिळाली असून अशी परवानगी मिळणारी ही जगातील पहिलीच लास ठरली आहे.

रशियाने लस निर्मिती केल्याचा दावा केला असला तरी या लसीबाबत अनेक वैज्ञानिकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. अशातच आता एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी रशियाच्या कोरोना लसीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रशियाच्या लसीबाबत बोलताना एम्स प्रमुख गुलेरिया म्हणतात, “रशियाने कोरोना लस निर्मिती केल्याचा दावा केला आहे. आता आपल्याला या लसीची परिणामकारकता व सुरक्षितता या दोन गोष्टींचे सूक्ष्मपरीक्षण करायला हवे. भारताकडे लसीच्या व्यापक निर्मितीची क्षमता आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.