पाथर्डी (प्रतिनिधी) – मी देवीभक्त आहे. देवीवरील श्रद्धाच मला येथे घेवून आली. देवस्थानच्या विकास आराखड्यासाठी लागणारा निधी शासन देईल. सरकार आपले आहे. पुढच्या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेवून देवीगडावर येवू. देवस्थानने विकासाचा केलेला आराखडा अंमलात आणण्यासाठी कर्तव्यभावनेतून देवस्थानसोबत असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
आमदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र मोहटादेवी मंदिर परिसर विकास आराखडा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी आराखड्याबाबत सविस्तर माहीती दिली. मोहटादेवीच्या भक्तनिवास समोरील बहुउद्देशीय सभागृह,ाघाट रस्ता रुंदीकरण, संरक्षण कठडे व पादचारीमार्ग, मंदिर संरक्षण भिंती, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, वॉटर ट्रीटमेंट प्लॅनट, मंदिर परिसरामध्ये पथदिवे, मंदिरावर, मंदिरात डेकोरेटिव्ह लायटिंग, सुवासिनी प्रसादालय अशा विकासकामांना गती देण्याचे बैठकीत ठरले. यावेळी गोकुळ दौंड, रणजित बेळगे, भीमराव पालवे, अशोक दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, ज्ञानेश्वर दराडे, आजिनाथ आव्हाड, महादेव दहिफळे, अर्जून धायतडक देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते.