नवी दिल्ली – अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने केंद्राला पाठवला आहे. त्यावर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून हरकत नसल्याचे पत्र देण्यात आले आहे.
देशात कुठेही अहिल्यानगर असे स्थानकाचे नाव नाही, त्यामुळे अहिल्यानगर करण्यास आमची हरकत नाही, असे पत्र रेल्वेचे उपसंचालक अमितकुमार मुखर्जी यांनी पाठवले आहे.
गेल्या वर्षी राज्यात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले. या दोन रेल्वे स्थानकांच्या नामांतरास मात्र अजून रेल्वेकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे, अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर करण्यासाठी किमान रेल्वेची तरी कुठलीही हरकत असणार नाही.