अहमदनगरच्या क्रीडा क्षेत्रास चालना मिळेल : प्रा.जाधव

नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांचा सत्कार
नगर (प्रतिनिधी)-
करोनामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द होत असल्यातरी वैयक्तिकरित्या खेळाडूंचा सराव सुरु आहे. लवकरच ही परिस्थिती सर्वसामान्य होऊन स्पर्धा पुर्ववत सुरु होतील. नगरमध्येही अनेक प्रतिभावंत खेळाडू असून, अनेकांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नगरचे नाव चमकविले आहे. नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी नगरच्या क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन देऊन चालना देतील. त्यांचा कार्यात संघटनांही योगदान देतील. जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करुन चांगले खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न करु, असे प्रतिपादन प्रा.सुनिल जाधव यांनी केले.

नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांचा विविध क्रीडा संघटनांच्यावतीने प्रा.सुनिल जाधव यांच्या हस्ते सत्कार करुन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र सायकलिंग असोसीयेशनचे सचिव संजय साठे, शैलेश गवळी, सतीश गायकवाड, ज्ञानेश्‍वर खुरंगे, विशाल गर्जे, दिनेश भालेराव, आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन क्रीडा अधिकारी शेखर पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध खेळांसाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यातून प्रतिभावंत व गुणवंत खेळाडू निर्माण व्हावेत, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकावेत हीच अपेक्षा आहे. शासनाच्यावतीने खेळाडूंना सर्वोतोपरि सहकार्य राहील. विशेषत: ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रशिक्षण द्यावे. नगर शहरातील स्टेडियम आधुनिक व सज्ज असून, त्याचा उपयोग करुन जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करुन, असे सांगितले. याप्रसंगी संजय साठे यांनी परिचय करुन दिला. तर शैलेश गवळी यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.