संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु. येथे प्रशासनाच्या वतीने नियमांचे पालन करून गणपती विसर्जन करण्यात आले.. ावेळी गणपती बाप्पाची विधवात पूजा व आरती करून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.
याप्रसंगी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रूपवते, सहायक फौजदार बाळासाहेब घोडे, सहायक फौजदार अनिल मोरे, पोलीस नाईक महेंद्र सहाणे, हेडकॉन्स्टेबल बढे, पोलीस नाईक लुमा भांगरे, पोलीस पाटील बाळासाहेब खरात, धांदरफळ बुद्रुकचे सरपंच भानदास शेटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी काळे, ग्रामविकास अधिकारी अशोक वरपे, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस मित्र दत्ता कासार विविध मंडळांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ कवडे, रावसाहेब डेरे, प्रदीप धुमाळ, संभाजी शेळके, मयूर कासार, रोहित शिंदे, शुभम भोपळे, वसंत वाकचौरे, अमोल त्रिभुवन, विलास शिंदे, मारुती मंडलिक, किरण वाकचौरे, विविध मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणरायाला निरोप देण्यात आला.