नगर (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्य चळवळीत नगरचे सुपुत्र असलेले देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढात इंग्रज सत्तेविरोधात मोठे आंदोलन करुन भारतीयांमध्ये देशप्रेमाची भावना त्यांनी जागृती केली होती. त्यांचे योगदान नगरकरांना अभिमानास्पद असेच आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा नगरकरांना सातत्याने राहिल, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिक रावसाहेब पटवर्धन यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. माजी महापौर अभिषेक कळमकर, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, विशाल वालकर, संजय वल्लाकट्टी, संतोष गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा म्हणाले, “”देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांच्या कार्याने देशात स्वातंत्र चळवळीत नगरच्या भूमिला विशेष स्थान प्राप्त झाले. त्यांचे हे कार्य पुढील पिढीला समजावे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.” नगरसेवक बोराटे, गिरिष जाधव यांनी व्यक्त केले. अमित सुडके, राजू औटी, मकरंद वाळके उपस्थित होते. देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांच्या स्मृतीदिनाचा महापालिकेस विसर पडल्याचा आरोपकरत शिवसैनिकांनी मनपाचा निषेध केला.