नगर (प्रतिनिधी) – राज्य परिवहन विभागाच्या माळीवाडा बसस्थानकाचे पुनर्बाधणीचे काम (दि. ४) सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धुळे, नाशिक, कल्याण, श्रीरामपूर, संगमनेर व नेवासे मार्गावरील सर्व बसेस तारकपूर बसस्थानक येथून सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस अहमदनगरहून पुण्याला धावली होती. पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे हे होते. त्यानंतर सरोज टाकी भागातून बस सोडल्या जात होत्या. राज्य परिवहन महामंडळाने माळीवाडा बसस्थानकातून सर्व बस सोडण्यास सुरूवात केली.
आमदार प्रा राम शिंदेंनी एमआयडीसीचा अंतिम आदेश काढून दाखवलाच !
महामंडळाचा जिल्ह्याचा कारभार या स्थानकातून पहिला जात होता. विभागीय नियंत्रक कार्यालय ही याच इमारतीमध्ये होते. राज्यातील प्रमुख बसस्थानकांमध्ये माळीवाडा बसस्थानकाचा समावेश होतो. माळीवाडा बसस्थानक येथून फक्त तारकपूर, पारनेर, श्रीगोंदे, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या आगारांच्या ग्रामीण फे-या मार्गस्थ होतील. विद्यार्थ्यांसाठी पास वितरण व्यवस्था व प्रवाशांसाठी संगणकीय आरक्षण प्रणाली (ऑनलाईन रिजर्वेशन सिस्टीम) ही स्वास्तिक बसस्थानक येथून कार्यान्वित राहणार आहे.