शिवसेनेला संकटात साथ देवून दाखविले प्रेम अन् निष्ठा
नेवासा (राजेंद्र वाघमारे) – राज्यातील शिवसेना नेत्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामिल होण्याचा धुमधडाका लावलेला असतांना दुसरीकडे अपक्ष निवडणुक लढवून बिनशर्त शिवसेनेला पाठींबा दिलेले आमदार शंकरराव गडाख यांनी मंञीपद गेले तरी शिवसेनेलाच आपला पाठींबा जाहिर असल्याचे स्पष्ट केल्यामुळे माजी मंञी शंकरराव गडाख यांच्यावर सेना नेत्तृत्वाकडून अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे.
सत्ता आणि पदापेक्षा आमदार गडाख यांनी पक्ष निष्ठेला महत्व देवून आपली आगामी राजकिय भूमिका सोनई (ता.नेवासा) येथे कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यातून उघड केली आहे एकीकडे राजकिय भुकंप झालेला असतांना अपक्ष आमदार गडाख यांनी मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहिर केलेले होते त्यामुळे गडाख शिवसेनेला जयमहाराष्ट्र करणार असल्याचे राजकिय पटलावर बोलले जात होते. गडाख मेळाव्यात नेमकी काय भुमिका घेतात याकडे राजकिय निरिक्षकांचे लक्ष लागून होते, त्यामुळे सोनईत असंख्य कार्यकर्त्यांनी मेळाव्यात घाव घेतली आणि गडाख यांनी शिवसेना सोडणार नसल्याची भुमिका स्पष्ट केल्यामुळे गडाख विरोधकही चांगलेच बिचकले आहेत.
सत्ता – पद आणि राजकारण प्रसंगानुरुप बदलत असते माञ शिवसेना पक्ष नेत्तृत्वाने अपक्ष आमदार गडाख यांना राज्य मंञिमंडळात कॅबिनेट मंञी केले संकटाच्या काळात साथ दिली त्यामुळे एकीकडे राज्यातील शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामिल होत असतांना दुसरीकडे गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे गडाख यांच्या या निर्णयाचे शिवसेना पक्ष नेत्तृत्वासह जनतेतून स्वागत केले जात असून एका अपक्ष अामदाराने पक्ष निष्ठा जपून सेना नेत्तृत्वावर विश्वास ठेवलेला आहे तर गेल्या कित्येक वर्षांपासून पद आणि सत्ता मिळविणारे आमदारांनी सेना सोडून शिंदे गटात सामिल होत असल्यामुळे राज्यात गडाखांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.